इंडिया अगेन्स्ट करप्शन चालवलीत स्वतःला झोकून देत नंतर आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या मयंक गांधीनी मराठवाड्यातील दुष्काळी भागात ठाण का मांडले? राजकारणाचा कंटाळा आल्यानंतर त्यांनी गावांचा विकास करण्याचा निर्णय का घेतला ? गोबल विकास ट्रस्टची निर्मिती करत विकासाचे नवे मॉडेल तयार करत शेतकऱ्यांना निर्भर कसे केले? मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी मयंक गांधींचा हा सर्व प्रवास समजावून घेतला आहे. त्यासाठी ही मुलाखत पाहा...