आज भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावर इंग्रजी साम्राज्यवादी भांडवलदारांना चले जाव च्या दिलेल्या घोषणेतून महाराष्ट्रात प्रतिसरकारचा झंझावात सुरू झाला. या सरकारने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रतिसरकारच्या सोनेरी इतिहासावर प्रकाश टाकला आहे. श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पुरोगामी नेते भारत पाटणकर यांनी...