सप्तश्रुंगी गडावर होणार १०० स्वच्छता गृहांची निर्मिती, एकनाथ शिंदेनी दिली मंजुरी
राज्यातील जनतेच्या श्रध्देचं स्थान असलेल्या साडे तीन शक्तीपिठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या सप्तश्रुंगी गडावर अनेक गरजेच्या सुविधांचा अभाव होता. स्वच्छतागृह, स्नानगृहांची पुरेशी व्यवस्था या देवस्थान परिसरात नव्हती. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्यी प्रमाणात गैरसोय होत असे. परंतू कल्याणकर सामाजिक संघटनेने ही बाब खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. सोबत १०० स्वच्छतागृह आणि काही लॉकर रूम्सची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत लवकरच यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.