भारतात जसे इंग्रजांचे होते त्याप्रमाणे सध्या देशात भारतीय जनता पार्टीचे हुकूमशाही राजकारण सुरू आहे, अशा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी EDने नोटीस बजावली आहे. यासाठी राहुल गांधी ईडीसमोर हजर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज देशभरात विविध ठिकाणी तीव्र आंदोलनं केली आहे.