दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गुजरात पोलिसांमध्ये सोमवारी अहमदाबाद दौऱ्या दरम्यान जोरदार खडाजंगी झाली. केजरीवाल हे रिक्षामधून एका रिक्षा चालकाच्या घरी निघाले होते. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी केजरीवाल आणि पोलिसांमध्य काही काळ वाद झाला. अखेर सुरक्षा नाकारात केजरीवाल त्या रिक्षाचालकाच्या घरी जेवायला गेले.