देशाचे 49 वे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपण दरवर्षी आषाढी वारी करत असल्याची आठवण सांगितली. यामध्ये सरन्यायाधीश लळीत म्हणाले की, मी दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करीत असतो. यामध्ये पुर्ण वारी शक्य झाली नाही तरी किमान वारीचा एक टप्पा तरी पुर्ण करत असतो. या वारीच्या आठवणी सांगतानाच मी दिल्लीत काम करीत असलो तरी माझे महाराष्ट्राच्या मातीशी नाते घट्ट आहे, अशी भावना व्यक्त केली.
मी दिल्लीत 37 वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केले. त्यामुळे मला मराठी येत असली तरी माझ्या मुलांवर दिल्लीतील वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे त्यांचा मराठीशी असलेला कनेक्ट तुटला असल्याचे मत सरन्यायाधीश लळीत यांनी व्यक्त केले.