32 धरणं बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जलधोरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी मिरवणूका काढल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डोक्यावर घेतला जात आहे. मात्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलनितीविषयी जाणून घेऊयात शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद यांच्याकडून...;

Update: 2023-02-19 08:47 GMT

400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्यामध्ये लोकशाही (Democracy) होती. लोकांचे राज्य होतं. राज संहिता होती. राजदंड होता, न्याय दंड होता, आणि न्यायावर चालणारी व्यवस्था होती. सामाजिक न्यायावर आधारित शिवरायांचा स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी होते आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न देखील होते. याबरोबरच राष्ट्रमाता जिजाऊ (Rajmata Jijau) या स्वराज्याचे न्यायालय होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे न्यायाधीश होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी खेड शिवापुर (Khed Shivapur) सहित 32 धरण बांधली होती आणि ती 32 धरणं आजतागायत आहेत. विशेष म्हणजे त्या धरणातून आजही एक पाण्याचा टिपूसही बाहेर येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जलधोरण समजावून घेण्याऐवजी आपण कुठल्यातरी वेगळ्या मार्गाने चाललो आहोत. त्यामुळे आपल्याला वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसते धरणे बांधून थांबले नाहीत तर त्याच्यातून जलसिंचनाच्या व्यवस्था ही त्यांनी निर्माण केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनाही राबवल्या होत्या, असं शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद यांनी सांगितले आहे.


Full View

Tags:    

Similar News