जिथे रेल्वे फाटक बंद करायचे आहे तिथे पुलासाठी मी पैसे देणार- नितीन गडकरी
रेल्वे फाटकांमुळे होणारा वाहनांचा खोळंबा रोखण्यासाठी त्यावर पुल बांधण्याचा पर्याय आहे. पण निधी अभावी असे अनेक पूल रखडले आहेत. पण आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. रेल्वे फाटक बंद करण्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकार निधी देईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.