मेडिकल कॉलेजवरून भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात भाजप खासदाराने मेडिकल कॉलेजवरून सरकारला घरचा आहेर दिला.;

Update: 2023-02-10 06:22 GMT

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भंडारा-गोंदिया (Bhandara Gondia) चे भाजप खासदार सुनिल मेंढे (Sunil Mendhe) यांनी गोंदिया मेडिकल कॉलेज कधी होणार? असा सवाल उपस्थित केला. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय (Dr. Mansukhk Mandviya) यांनी सांगितले की, गोंदिया (Godia Medical College) जिल्ह्यात होणारे मेडिकल कॉलेज (Medical College) लवकरच पुर्ण करण्यात येईल. त्यामध्ये जमीनीच्या अधिग्रहणाबाबत काही अडचणी आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून ही जागा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. ही जागा केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याकडे हस्तांतरीत झाल्यास तातडीने हे मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येईल. त्याबरोबरच भंडारा जिल्ह्यातील कॉलेजसंदर्भातही डॉ. मनसुख मांडविय यांनी आपली भूमिका मांडली.

Tags:    

Similar News