महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.
भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची माणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असं म्हणत राज्यपालांना खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांमध्ये आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचित केली... पाहा काय म्हटलंय चंद्रकांत खैरे यांनी