एक महिना उशीरा पाऊस पडल्यामुळे बीडमध्ये पेरण्या उशीरा झाल्या. त्यानंतर पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशाबश्या पेरण्या उरकल्या. बियांना कोंब फुटू लागले. पीक उगऊ लागले आणि पुन्हा पंधरा दिवस पावसाने हुलकावणी दिली. उगवलेली पिके करपू लागली आहेत.
बीड जिल्ह्यातील तलाव, लघु सिंचन प्रकल्पामधील पाणी पातळी घटली आहे. बीड जिल्ह्यात १४३ प्रकल्प आहेत त्या मधला १ मोठा प्रकल्प आहे. १६ मध्यम प्रकल्प तर १२६ लघु प्रकल्प असे एकूण १४३ प्रकल्प आहेत. पाऊस नसल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. आता या प्रकल्पांची पाणी पातळी खालावत आहे.
लघु मध्यम प्रकल्पामध्ये केवळ १३ % पाणीसाठा उपलब्ध आहे. जर पुढील कालावधीत पाऊस पडला नाही तर बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते.
कोणत्या प्रकल्पात किती जलसाठा यावर एक नजर टाकूयात.
मोठ्या प्रकल्पांत १३.५३% जलसाठा
माजलगाव धरणात १५.८७%
मांजरा धरणात २६.८५%
बिंदुसार धरणामध्ये २०% टक्के
बीड जिल्ह्यात यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात म्हणजे २४१ मिलिमीटर पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. येणाऱ्या कालावधीत पाऊस जर नाही पडला तर बीड जिल्ह्यावर जल संकट येऊ शकते.