बार्टी, महाज्योती आणि सारथी ठरतंय ठेकेदार,अधिकाऱ्यांसाठी कुरण?
बार्टीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. यामागं नेमकं कारण काय आहे? महाज्योती आणि सारथीच्या विद्यार्थ्यांच्या मनातही का आहे खदखद? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी विविध विद्यार्थी संघटनांशी थेट चर्चा केली.;
बार्टीच्या विद्यार्थ्यांचे 50 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. सारथीच्या विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मात्र याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष सुरु आहे. यावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत.