तब्बल तीन वर्षांनंतर मंगळवारी संध्याकाळपासून स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडवरील राजसदरेसमोरील बॅरीकेड्स बाजूला करुन शिवप्रेमी आणि पर्यटकांना राजसदरेवर दर्शनासाठी जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. राजसदरेवरील मेघडंबरीच्या क्षेत्रात जाण्यासाठी सर्वांना बंदी घालण्यात आली होती. यासाठी राजसदरेच्या पायऱ्यांवर लाकडी बॅरीकेटींग करून मार्ग बंद करण्यात आला होता. मंगळवारी केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हे लाकडी बॅरीगेट मेघडेबरीच्या जवळ घेत राजसदरे समोरील चौथर्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली. बंदी असलेल्या काळात शिवप्रेमी आणि पर्यटकांना दुरून दर्शन घ्यावे लागत होते.