अंधःश्रध्दा आणि अविवेकी जगण्यातून विवेकाचा मार्ग दाखवण्याचं काम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलं. त्याच्या विचारांचा पाय़ा इतका भक्कम होता की त्यांना संपवल्यानंतरही त्यांचे विचार अनेकांची आयुष्य बदलत आहेत. अशाच पनवेल येथे रारहणाऱ्या मीना मोरे यांनी देखील दाभोलकर कला प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिली आणि उपस्थितांना स्वतःचा अनुभव देखील सांगितला.
शिक्षणानंतर लग्न आणि मग घरातील धार्मिक वातावरणामुळे आसाराम सारख्या भोंदूची भक्ती मनापासून केली. या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक अंधःश्रध्देचं पालन त्यांनी केलं. आणि मग एक दिवस डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं पुस्तक त्यांच्या हाती पडतं. ते वाचता वाचता त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला सुरूवात केली. असं करताना मग पुढे त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायला सुरूवात केली. आणि आता त्या अंनिसच्या सक्रीय कार्यकर्त्या आहेत. त्यांचा हा प्रवास नक्की कसा होता जाणून घ्या स्वतः मीना मोरे यांच्याकडून....