राज्यात 'ऑक्सीजन' माफिया तयार झालेत का? जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरींनी केला ऑक्सिजनच्या काळाबाजार भांडाफोड

जागतिक महामारी कोरोमुळे असंख्य जीव गतप्राण होत असताना मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा देखील प्रकार सुरू आहे, जीवघेण्या संकटात ऑक्सीजन टँकरची पळवापळवी आणि काळा बाजारावर खुद्द देशाचे परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमात भाष्य करत दोषींवर कठोर कारवाई केल्याचे जाहीर केले.;

Update: 2021-05-10 07:59 GMT

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णवाढ झाल्यामुळे ऑक्सीजन,आयसीयू बेड,रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. या संकटाच्या काळात आता ऑक्सीजनचाही काळाबाजार होऊ लागला आहे. नफेखोर या तुटवड्याचा फायदा घेत आहेत. राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांतून ऑक्सीजन साठा उपलब्ध करुन दिला आहे. या ऑक्सीजन साठ्यात नफेखोरी होत असल्याचा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. नितीन गडकरी भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी बोलत होते. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत आहे. परंतु राज्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे बाहेरील राज्यातून हा ऑक्सीजनचा साठा आणला जात आहे. परंतु नांदेडला ऑक्सीजन पुरवठा करण्यात येणारा ऑक्सीजनचा टॅंकर पळवल्याचे गडकरींनी सांगितले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्याला फोन केला असल्याचा नितीन गडकरींनी सांगितले. अशोक चव्हाण म्हणाले नांदेडला विशाखापट्टनमहून ऑक्सीजनचा पुरवठा करणारा टँकर तेथील ट्रान्सपोर्टरने पळवला असून आपल्याकडे त्याने १५ लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे त्याचे टँकर जप्त करण्यात आले आहेत.

अशोक चव्हाण यांनी सांगितल्यानंतर रात्री १२ ते १ च्या सुमारास त्या ट्रान्सपोर्टरला फोन केला. त्याच्यावर दबाव टाकून त्याला म्हणालो हे बरोबर नाही. तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, यानंतर त्या ट्रान्सपोर्टरने तो टँकर सोडला. यामुळे अशोक चव्हाण यांच्या फोननंतर गडकरींनी ताबडतोब ऑक्सीजनचा टँकर सोडवला असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

Full View
Tags:    

Similar News