धर्माच्या नावाखाली देशात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे विविध प्रयोगांच्या माध्यमातून बुवाबाजी करणारे लोक कशा पद्धतीने हात चला की करतात याचे दर्शन घडवले. कोण कोणत्या प्रकारे अंधश्रद्धा पसरवली जाते, याबाबत अंनिस च्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आगीचा वापर न करता यज्ञ कसा पेटवला जातो, लिंबातून काळा दोरा कसा काढला जातो, पेटलेला कापूर तोंडात टाकल्यावर चटके का बसत नाहीत याचे विज्ञानाच्या आधारे प्रयोग समजून सांगितले. याचा आढावा भरत मोहळकर यांनी घेतला आहे.