उद्या देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन. संबंध देशभरात स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. पण दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र, तणावपूर्ण परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये इंटरनेट, फोन, आणि संवादाची माध्यमं बंद करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात लादलेली ही एकप्रकारची अघोषित आणीबाणी असल्याचं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना वाटतं.
या निर्णयाच्या विरोधात गेल्या १० दिवसात दगडफेकीच्या १४० घटना घडल्या आहेत. ज्यात ४० जण जखमी झालेत. यामध्ये लहान मुलांपासून, मोठ्यांपर्यंत आणि सुरक्षा दलाच्या जवानांचाही समावेश आहे. असं असूनही सरकार सर्वतकाही सुरळीत असल्याचा दावा करतंय. काश्मीर खोऱ्यातली खरी परिस्थिती दाखवणाऱ्या प्रसारमाध्यमांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा वातावरणात हा स्वातंत्र्योत्सव जम्मू-काश्मीर आनंदाने साजरा करेल का असा प्रश्न उभा रहातो.
७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या संपूर्ण विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण पहा,