स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मॅक्स महाऱाष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुजिव मुलाखतीमध्ये मराठी सिनेसृष्टी, बदलते तंत्रज्ञान, आताच्या काळात बदलेली जीवनमूल्य याचे परखड आणि सकारात्मक विश्लेषण केले आहे. आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी मोहन आगाशे यांच्याशी संवाद साधला. चित्रपट सृष्टी म्हणजे केवळ मायावी दुनिया आहे, हल्ली वास्तवाला धरून काही चित्रपट होतात पण त्यांचे प्रमाण कमी आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पण त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट अधिक प्रगत आहेत, दाक्षिणात्य चित्रपटात केवळ मनोरंजन व आर्थिक दृष्टीने विचार केला जातो, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.
त्याचबरोबर त्यांनी बदलेल्या राजकीय स्थितीवरही भाष्य केले. तसेच आजच्या काळात फक्त आदर्शवादी पद्धतीचं शिक्षण दिलं जात आहे मात्र त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही, गुणवत्तेपेक्षा पैसे मिळवण्यासाठी शिक्षण घेणाची वृत्ती वाढत आहे, असेही परखड मत त्यांनी नोंदवले.