अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना फटकारले
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यापार्श्वभुमीवर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
संभाजी भिडे (sambhaji Bhide) यांनी मंत्रालय परिसरात प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो, असं वक्तव्य केलं होते. त्यानंतर महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याबरोबरच राजकीय नेत्यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) म्हणाल्या की, महिलेने टिकली लावायची, कुंकू लावायचे की न लावायचे हा तिचा अधिकार आहे. पण जर तुम्ही टिकली लावली नाही म्हणून भारत माता असं म्हणत असाल तर बिल्कीस बानोच्या (Bilkis Bano) बलात्काऱ्यांचा सत्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) असो की तुम्ही अजून कुणीही माफी मागितली नाही. त्यामुळ भिडे यांनी माफी मागावी, असं मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या की, संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबाबत अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे ही एक दिवाळखोरी आहे. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले की, मीडिया मनोहर भिडे (Manohar Bhide) यांना एवढे महत्व का दिलं जातं, असा सवाल केला.
मात्र अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला संभाजी भिडे यांच्याबाबत मला आदर आहे. पण महिलांनी कुंकू लावावं की नाही, कोणत्या प्रकारचे कपडे घालावे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मनोहर भिडे यांनी महिलांबाबत वक्तव्य करू नये, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.