आषाढी वारीच्या निमीत्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. मात्र या वारीत जिहाद सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर सुरु आहे. यामध्ये हिंदूस्थान पोस्ट नावाच्या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात एक मुस्लिम व्यक्ती अल्ला देवे, अल्ला दिलावे हा अभंग म्हणत आहे. त्यापाठोपाठ वारकरीही हा अभंग म्हणत आहेत. हा व्हिडीओचा संदर्भ देत वारीत जिहाद सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र या दाव्यामागचं सत्य मॅक्स महाराष्ट्रने डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्याकडून जाणून घेतलं आहे. नेमकं काय आहे सत्य? जाणून घेण्यासाठी नक्की पहा...