कुडाळ येथील निर्भय बनो संवादामधून अॅड. असिम सरोदे लाईव्ह
कुडाळमध्ये निर्भय बना सवांदातून सभेतून जनतेला हुकूमशाहीविरोधात लोकशाही मजबूत करण्यासाठी ऍड. असीम सरोदे यांचे आवाहन;
Kudal : लोकशाही टिकली पाहिजे यासाठी आमचा हुकूमशाही विरोधात निर्भय बनो लढा सुरू आहे. त्यात आपण सहभागी व्हा आणि लोकशाही मजबूत करा असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी केलं.
निर्भय बनो संवाद यात्रेच्या निमित्ताने ऍड. सरोदे आपल्या सहकाऱ्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी बैठकीत अॅड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं. निर्भय बनो अभियानाबाबत त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, केंद्र सरकार यांच्यावर त्यानी सडकून टीका केली. दरम्यान अॅड. संदीप निंबाळकर, नंदू पाटील यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी महाविकास आघाडीचे संजय पडते, अतुल बंगे, अभय शिरसाट, भास्कर परब, महेश परुळेकर, अमरसेन सावंत, शिवाजी घोगळे, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, संदीप मांजरेकर, तसेच डॉ. विजयालक्ष्मी चिंडक आदी मान्यवर सभागृहात उपस्थित होते.