प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी नुकतीच बारामतीमध्ये पवार कुटुंबांने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित लावली. गेल्या काही दिवसात शरद पवार हे गौतम अदानी यांच्यासोबत दोनवेळा जाहीर कार्यक्रमात दिसले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजकांना सोबत घेण्याची जी इकोसिस्टीम भाजपने जपली आहे, तशीच इकोसिस्टीम शरद पवार जपत आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे पक्ष सत्तेत असले की उद्योजक धार्जिणे धोरण राबवत असतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांचे काय म्हणणे आहे ते पाहूया...