'शाळा' ही विद्येची मंदिर असते हे खरं आहे. शाळा म्हणजे लहानपण आणि लहानपण म्हणजे शाळा हे समीकरण काही चुकीचं नाही.. शाळेत केलेली दंगामस्ती, तास सुरू असताना हळूच खाल्लेला डब्बा आणि अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून खाल्लेला बाईंचा मार, ही मज्जा काही वेगळीच होती.. बाईंनी मारलं की, राग यायचा पण त्यांचा तो मार आता आठवून फार हसायला येत...पाहा या संदर्भातील गौरी बैकर यांचा रिपोर्ट