नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सय्यद फकिरा यांनी शहरातील प्रत्येक शाळेसमोर 10 दिवस उपोषण करण्याचा निर्धार करत आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. शाळा नवी मुंबई महापालिका आणि सिडकोकडून भूखंड घेतात, सवलती मिळवतात पण फीसाठी विद्यार्थ्यांना त्रास देतात, भरमसाठ डोनेशन घेतात, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शाळांना सवलती का दिल्या जात आहेत, महापालिका आणि सिडको प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित करत फकीरा यांनी माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...