औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी एक आगळावेगळा लग्न सोहळा पार पडला. रुपाली आणि विवेक यांनी पोलीस ठाण्यात एकमेकांच्या गळ्यात हार घालून जन्माचे सोबती झाले. रुपाली आणि विवेक हे दोघे गेली 7 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतात. मात्र घरच्यांना सांगूनही अपेक्षेप्रमाणे घरच्यांनी विरोध केला....एवढंच नाही तर रुपालीच्या घरच्यांनी लग्न होऊ नये म्हणून तिला घरात ठेवले आणि बाहेर जायलाही तिला मनाई होती...त्यामुळे रुपालीने थेट स्वतः आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.
यामुळं विवेक मात्र कासावीस झाला काय करावे कळेना, त्यामुळं त्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना मदत मागितली, विवेक आणि रुपालीने घरच्यांना न सांगता काही महिनेआधी कोर्टात लग्न केले होते. त्यामुळे पोलिसही मदतीला धावले आणि रुपालीला त्यांनी पोलीस ठाण्यात आणले व विवेकही आला... दोन्ही कुटुंबियांची पोलिसांनी समजूत घातली आणि प्रकरण मिटले.. मग काय हार फुलं आले, पोलीस कामाला लागले आणि थेट पोलीस ठाण्यात एकमेकांना हार घालून लग्नही पार पडले...