बदलत्या काळानुसार सिनेसृष्टीसोबतच मराठी नाट्यसृष्टीलाही ग्लॅमर मिळाले आहे. पण नाट्य हे केवळ मनोरंजन, प्रसिद्धि आणि ग्लैमरचे क्षेत्र नसून नाटकाच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचेही साधन आहे. त्यातून व्यक्ती आणि समाज घडवण्याचे काम व्हावे हा ध्यास घेऊन 'थिएटर ऑफ रिलेवन्स' ही संस्था गेली तीन दशक काम करीत आहे. त्यांच्या त्रि-दशकपूर्ती निमित्त त्यातील कलावंतांच्या सोबत संवाद साधला किरण सोनावणे यांनी...