वृत्तपत्र - मंत्र्यांचा क्रिकेट सट्टा - चमत्कार - खेळातील भोंदुगिरी.
घ्या-आस्वाद-मेजवानी आमच्या माहिती भांडाराची.
घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।
उठी लवकर वनमाळी उदयाचळी मित्र आला ।।
असे अजरामर स्वर-ताल व लयबद्ध सुमधुर शब्दांच्या ओव्या जेव्हा कानी पडतात, तेव्हा तुमची-आमची प्रसन्न झालेली निद्रादेवी सुद्धा कळत नकळत कुणासही साखरझोपेतून उठण्यास भाग पाडते व दिवसाच्या जीवन उपक्रमांना आरंभ करण्यास शक्ति-बुद्धी सहित उर्जाही देते. प्रौढावस्थेतील कुणीही सकाळच्या चहासोबत वृत्तपत्र नामक जीवनसत्त्वाव्यतिरिक्त चहाचा आनंद घेऊ शकत नाही. कारण बहुतांशी सर्वांनाच हे व्यसनच जडलेले असते. जगातील सर्व स्तरावरील घडामोडींचा आढावा घेणे हे बुद्धीजीवींचे कर्तव्य-कर्मच आहे अशी त्यांची धारणा असते.
वृत्तपत्राचे नाव-गाव-संपादकीयसहित छापून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या बातम्या-मजकूर हे डोळ्यांखालून घालून मनी-उदरी पचनी पडल्यावरच त्या वृत्तपत्रास आपली पसंदी देऊन घरात स्थान देतात. अनेक वृत्तपत्रे आपली स्वत:चीच पहिल्या क्रमांकाची निवड करून जाहीरातीद्वारावाचकांवर छाप पाडण्यासाठी अशा घोषणा करून बिंबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. परंतु विद्वान मंडळी बळी न पडता ‘ऐकावे जनाचे पण करावे मनाचे’ या सिद्धांतान्वये निवड करतात.
दिल्लीकरांसाठी मुंबई ही आर्थिक राजधानी व तसा दर्जाही त्यांनीच दिला. उद्योग-धंदा-व्यवसाय-नोकरी-चा
या शहरात जाती-धर्मानुसार त्यांच्याच मायबोलीमध्ये त्यांच्याच मूळ प्रांतात रोजच्या दैनंदिन जीवन व्यवहारात काय चालू आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक भाषांतून प्रकाशित झालेली वृत्तपत्रे-मासिके व इतर विषयक सर्व मुंबईत उपलब्ध होते. सर्व स्तरावरील फसवणुकीचाधंदाही येथे तेजीत चालतो. भागीदारही सहज मिळतात.
वृत्तपत्राच्या व्यवसायात राजकारणी, गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या पट्ट्यात (प्रांतात) वावरणारे लोकप्रतिनिधींचीही कमतरता नाही. तेही असंख्य आहेत. आपण अनावश्यक, वायफळ वक्तव्ये करत जे बोंबलतो ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उपक्रम. आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन-आचार विचारांचा व्यापार, स्वत:चे हसे करून घेण्याचेही त्यांना भान नसते.
‘मुह से दाम और बगल मे छुरी’ हे झुमरी तलैया प्रांतातील भुलभुलैया गावातील ‘वाटलावे-आगलावे’ नामक प्रतिनिधी आपापली जीवनरहस्य, गुपिते, उघड्या तोंडाने - ताठ मानेने - डोळ्यात - डोळे घालून शिष्यांना कथित करू शकतील का?
राजकारण्याना त्यांची केलेली स्तुती प्रिय आहे. नाजुक प्रश्नांना ते उत्तरे देण्याचे एकतर टाळतात किंवा पळतात. त्यांना जर तुम्ही गोचडीच्या वंशाशी संबंधित आहात असा जर भास झाला तर मात्र त्यांच्या पाळीव प्राण्यांना ‘छू’ असा आदेश देतात व मग बाऊन्सर-बॉक्सर-बुलडॉग कुणीहीतुमच्या अंगावर धावून येऊ शकतो. काढता पाय घेण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय शिल्लक उरत नाही. यांच्या घराचे पोलादी दरवाजे-नियुक्त केलेले द्वारपाल त्यांचा श्रीमंतीची-उधळपट्टीची सदैव साथच देत असतात.
उदाहरणच द्यावयाचे झाल्यास चारा घोटाळा बिहाररत्न लालू यादवचे भ्रष्टाचार, लक्ष्मीही लाजेल एवढी संपत्ती. त्यासाठी पुऱ्या खानदानाचा भालू सेवेचा सहभाग-सहयोग-सानिध्य व ती वाचण्यासाठीची धडपड, विहारच्याच राजकारणास लावण्यात आलेला सुरुंग, काळू बाळूशीघेतलेला राजकीय घटस्फोट ही कशाची लक्षणं आहेत? मुलगा-मुलगी दोघेही बिहारच्या मंत्रीमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून. बिहारची युवा ब्रिगेडचे आदर्श व्यक्तिमत्वात गणना होऊन ही प्रगती का अधोगती? अशांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल का?
लालू यादवचे सहकुटुंब-सहपरिवारातील (मित्र पक्षाचा हातही) सूडबुद्धीने वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी वर प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, त्यांनी यापूर्वी केलेला भ्रष्ट कारभार जनतेसमोर बाहेर काढला जात असल्याने पडत आहे असे चित्र वाहिन्यांचा पडद्यावर झळकत आहे.
पाकिस्तानात पंतप्रधानपदाची इच्छा बाळगणारा त्यांचा देशाचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार - द्रुतगती गोलंदाज कदाचित घोर निराशेच्या छायेत सध्या वावरत आहे.
‘ये पब्लीक है सब जानती है - आखिर पब्लिक है (मगर पाकिस्तान की) प्रार्थना स्थळीच हे प्रार्थना करणाऱ्या जनसमुदायाची कत्तल बाँबस्फोटाने करतात अशा भूमीचा गुणधर्म मानून आपण कोणत्या आशयाचे भाष्य करावे?
आपल्या प्रादेशिक वाहिन्यांमध्ये टी.आर.पी.ची मोठी स्पर्धा असते व रंगते. या वाहिन्यांना स्वत:चे नाही पण दुसऱ्यांचे सुवेर-सुतक दोन्हीही लागते. राजकारणी लोकप्रतिनिधी, सिनेकलावंत यांचे अतिशय जवळचे नातेवाईक असतात, जे वाहिन्यांच्या प्रतिनिधींना बातम्या-माहिती यांचाखाद्य पुरवठा करतात. यातील एखादा विषय-मुद्दे यात टाकण्यात येणारा तिखट मसाला यातून होणारा पदार्थ जर मांसाहारी केला-झाला तर त्यास रसिक पसंदी, झणझणीत आस्वादाचा अंदाज घेऊन मग लक्ष्यवेधी कार्यक्रम-चर्चा-सत्र, यासाठी आमंत्रित केलेल्यांना विषयाची जाण असो-नसो, त्यांची लायकी असो वा नसो, वाहिनीचे संभाव्य फेव्हीकॉल लावून फिक्सींग. जणू काही अजोड-अतुट नाता-वास्ता यांचे मिश्रीत मुखवटा.
वाहिनी बातमीचा इम्पॅक्ट म्हणून बोंबलते तेही दिवसभर परंतु एखादी व्यक्ती जर सामाजिक कार्यकर्ती नसेल तर ही वाहिनी अशांचे बारसे करून नामकरण विधी पार पाडून त्यास समाविष्ट करून घेते. अर्थात मागील दरवाज्याने. हे कोणत्या विद्वत्तेचे प्रतिक समजावे? वाहिन्यांचे वृत्त-बातमी-फोटो प्रसंग माहिती हे सर्व काही सेकंदापुरते मर्यादित राहिल्यावर काही अवधीनंतर लगेचच याचा आपणास विसरही पडू शकतो. वृत्तपत्र संग्रही राहाते. वाचनास उपलब्ध होते.
अभिनेत्री रेखा गणेशन तसेच भारतरत्न - सर्व अग्रगण्य पुरस्कारांचा मानकरी तसेच राज्यसभा सदस्य. हे दोघेही केंद्र सरकारच्या राजकारणातील राज्यसभेचे सदस्य असूनही सत्रात अधिवेशनात भाग घेत नाहीत. केवळ सुख-सोयी-सुविधांचे मानकरी होतात, परंतु आवश्यक ते योगदानकरीत नाहीत. यांनी राजीनामा तरी द्यावा अथवा पक्षाने त्यांच्यावर कार्यवाही करून सदस्यता रद्द करावी अशी मागणी यापूर्वीही झालेली आहे व २०१९ पर्यंत हा विषय वारंवार चघळायला विरोधींना संधीही आहे. हा विषय रसिक प्रेक्षक- मायबापांचा पाठ झालेला आहे.
एवढ्या वेळेस प्रदर्शित झालेला असूनही या वाहीनीने हा विषय पुन्हा हाताळून काय सिद्ध केले? या वाहिनीच्या संपादकांवर सरस्वती प्रसन्न आहे, व्यक्तिमत्व सहज सुंदर लोभस, आत्मविश्वास ठायी ठायी भरलेला, नवग्रहांसारखा सहकारी वर्ग परंतु एखादा दिग्वीजयीने आपल्या कर्तव्यकर्मात वाळवी लागलेले कृत्य केल्यास - झाल्यास त्याचे परिणाम पाहाणाऱ्या प्रेक्षकांनी भोगावे का?
क्रिकेटचा गंध : छंद किंवा घराण्यात कुणाचाही काडीमात्र संबंध नसलेल्या मुंबई-पुणे प्रवासात गुंतलेली अभिनेत्रीचे कोणत्याही स्पर्धेसाठी मत घेणे व तिने देणे ही वाहिनीची ओळख समजावी का? समाजातील प्रतिष्ठा याचे मोजमाप कोण करणार? उत्तुंग व्यक्तिमत्वेही स्वत:स कशीही-केव्हाही-कोठेही ‘सेलेब्रिटी’ म्हणवून घेत नाहीत. पाय जमिनीवरच ठेवून रोवले जातात.
ज्याचा चंद्र कुंडीतच उगवतो व कुंडीतच मावळतो असा पंडीत या वाहिनीचे आकर्षण. वाहिनी एका माजी कसोटीवीराची नियुक्ती त्यांच्या कार्यक्रमासाठी करते. मी व्यसनी आहे. तीर्थप्रशान करून अगदी रस्त्यावर पडते व आपण गुणी पोलीसवर्ग ओळख पटवून तिला स्वगृही पोहोचतेकरते. कार्यक्रमास येऊ शकत नाही. आलेला नाही हे जाणवते. सर्व सामान्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्या चर्चिल्या जातात ते वाहिनीस न कळाव्यात यात किती तथ्य आहे, पण ही वाहिनी अशावरच भरभरून प्रेम करते.
खेळणे-बोलणे यात बरेच अंतर आहे. आपले व्यक्त केलेले अज्ञान, अचकट-पचकट बोलणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल काय? समीक्षकांपेक्षा घटक-मानवीस अधिक ज्ञान आहे असा भास होतो. ज्यांना रस्त्यांच्या खड्ड्यांबद्दल विचारणे योग्य ते खेळासंबंधी कोणत्या अधिकारात भाष्य करणार? याच वाहिनीने त्यांच्या व्हायरल सर्चमधून शोध घ्यावा. अनेक वास्तव्यातील सत्य घटना अगदी मुरलीधरन ते तय्युब बाबत मुंबई लाल दिवा सकट राहील.
एकच नारा - माझा म्हणूच नका - तो केवळ तुमचाच तेही तुम्ही म्हणतात म्हणून आमचा कुणाचाच नाही. तुमच्या हाकेस ओ दिली. डोळे उघडून नीट पाहिले परंतु नको ते पाहण्यास मिळते. ही खंत. विद्वानांचा शोध घ्या. बाणकोटकर दिवाळे काढतील.
(क्रमश:)