India Vs Netherlands : विजयी घोडदौड राखणे भारतासाठी कठीण

T-20 World Cup, IND vs NED : पाकिस्तानविरोधात विजय मिळवल्यानंतर आता भारताची लढत नेदरलँडशी होणार आहे. मात्र पाकिस्तान विरुध्द विजय मिळवला असला तरी विजयी घोडदौड राखणे भारतासाठी कठीण ठरण्याची शक्यता आहे.;

Update: 2022-10-27 01:15 GMT

India Vs Netherlands : ICC T-20 विश्वकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर (Ind vs Pak) विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच भारताचा दुसरा सामना नेदरलँडशी (Netherlands) होणार आहे. मात्र तरीही हा सामना भारतासाठी सोपा असणार नाही, असे मत क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

भारतासारख्या बलाढ्य संघासमोर नेदरलँड हा संघ कमकुवत मानला जात आहे. मात्र त्यापुर्वी झालेल्या काही उलथापालथींमुळे भारतीय संघासोबतच चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

जगातील प्रभावशाही क्रिकेट संघांपैकी एक असलेल्या इंग्लड संघाला आयर्लंड (ENG vs Ire) संघाने पराभवाचा धक्का दिला. तसेच यापुर्वी वेस्ट इंडिज (West indies) संघालाही अशाच प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मेलबर्नमध्ये (melborn) अफगाणिस्तान विरुध्द न्युझीलंड (Afganistan VS New Zealand) सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. त्यातच गुरुवारी भारताची लढत नेदरलँडशी होणार आहे. त्यामुळेर पहिल्या सामन्यातून मिळालेली विजयी घोडदौड भारतीय संघाला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

गुरुवारी होणाऱ्या भारत विरुध्द नेदरलँड (Ind Vs NED) स्पर्धेत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पाऊस (Rain)पडला तर भारतीय संघाच्या हातून दोन गुण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावसाचा थेट फायदा नेदरलँड संघाला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. त्यापाठोपाठ पहिल्यास सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीचा दावेदार मानला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर गृप 2 मध्ये बांग्लादेशनेही विजय मिळवून गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र इंग्लड- आयर्लंड, झिंबाब्वे विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्याप्रमाणे पावसाचा व्यत्यय आला तर गृप 2 मधील गणितं बिघडतील. त्यामुळे भारतीय संघाच्या घोडदौडीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग हे 11 खेळाडू संघात असतील. त्याबरोबरच मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि रवी बिश्नोई हे खेळाडू राखीव असणार आहेत.

ICC T-20 World Cup Schedule

  • भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
  • भारत विरुद्ध (ग्रुप A) मधील उपविजेते- २७ ऑक्टोबर (सिडनी)
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ३० ऑक्टोबर (पर्थ)
  • भारत विरुद्ध बांग्लादेश – २ नोव्हेंबर (एडिलेड)
  • भारत विरुद्ध (ग्रुप B) विजेते – ७ नोव्हेंबर (मेलबर्न)
Tags:    

Similar News