सहा जलतरणपटू मुंबई ते गोवा समुद्रात पोहून करणार जागतिक विक्रम

मुंबई ते गोवा आणि पुन्हा परतीचा प्रवास वसई किल्ला असे तब्बल ११०० किलोमीटर अंतर समुद्रात पोहून नवा विश्वविक्रम करण्यासाठी ६ जलतरणपटूंनी गेट वे ऑफ इंडियातून समुद्रात उड्या मारल्या. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.;

Update: 2022-12-20 14:16 GMT

मुंबई ते गोवा आणि पुन्हा परतीचा प्रवास वसई किल्ला असे तब्बल ११०० किलोमीटर अंतर समुद्रात पोहून नवा विश्वविक्रम करण्यासाठी ६ जलतरणपटूंनी गेट वे ऑफ इंडियातून समुद्रात उड्या मारल्या. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.वसई-विरार ओपन वॉटर स्विमिंग फाउंडेशन या संस्थेच्यावतीने या विश्वविक्रमाची तयारी करण्यात आली आहे. मुंबई ते गोवा आणि पुन्हा परतीचा प्रवास गोवा ते वसई किल्ला असा समुद्र प्रवास न थांबता ११०० किलोमीटर बारा ते पंधरा दिवसांचा होणार आहे. या विश्वविक्रमाची सुरुवात गेट वे ऑफ इंडिया येथून शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता झाली.

 



 



कार्तिक संजय गुगले (वय २० वर्षे), राकेश रवींद्र कदम (वय २४ वर्षे), सपना रमेश शेलार (वय २१ वर्षे), जिया राय (वय १४ वर्षे), दुर्वेन विजय नाईक (वय १७ वर्षे), व राज संतोष पाटील (वय १७ वर्षे)हे सहा जलतरणपटू गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत न थांबता पोहून एकूण ११०० किलोमीटरचे अंतर पूर्ण करतील. हे अंतर १२ ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचं जलतरणपटूंचं लक्ष्य आहे. हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यू.एस.ए. येथे २०१९ मध्ये स्थापित ९५९ किमीचा सध्याचा जागतिक विक्रम मोडला जाईल. वसई-विरार ओपन वॉटर स्विमिंग फाउंडेशनने या उपक्रमासाठीच्या सर्व प्राथमिक परवानग्या आधीच मिळवल्या आहेत.




 


सहभागी जलतरणपटूंपैकी एक जण किमान चार ते पाच तास पोहणार, त्यानंतर तो जलतरणपटू विश्रांती घेईल. नंतर अन्य सहकारी पुढचे अंतर पोहून पार करतील. अशा पद्धतीने विनाथांबा ११०० किलोमीटर अंतर पोहून पार केले जाणार आहे.कार्यक्रमास मोलाचं सहकार्य (बाळासाहेबांची शिवसेना) चे विभाग क्रमांक ५ विभागप्रमुख कुणाल सरमळकर, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे चे वसई तालुकाप्रमुख राजाराम बाबर तसेच जगदिश सुरेश केळशीकर शिवसैनिक/समाजसेवक यांनी मदत केली आहे.

Tags:    

Similar News