IPL 2023 मध्ये पंजाबची विजयी सलामी, डकवर्थ लुईस नियम ठरला महत्वाचा
पंजाबने IPL च्या पहिल्याच सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात विजयी सलामी दिली. यामध्ये डकवर्थ लुईस नियम महत्वाचा ठरला.;
IPL 2023 मध्ये पंजाबने पहिल्याच सामन्यात कोलकत्ताचा पराभव करत विजयी सलामी दिली. या मोहाली या होमपिचवर खेळल्या गेलेल्या सामन्यावेळी पाऊस झाल्याने डकवर्थ लुईस नियमाने पंजाबला विजयी घोषित करण्यात आले.
शिखर धवनच्या नेतृत्वात IPL 2023 ची सुरुवात किंग्ज पंजाबने कोलकत्ता नाईट रायडर्सचा पहिलाच पराभव केला. यामध्ये कोलकत्ताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 191 रन केले. त्यानंतर कोलकत्ताने प्रत्युत्तरादाखल 16 ओव्हरमध्ये 146 रन केले. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे डकवर्थ लुईस नियम लावण्यात आल्या. या नियमांतर्गत पंजाबचा 7 रनांनी विजय झाला. यावेळी कोलकत्ताला 24 चेंडूत 46 रनांची आवश्यकता होती. मात्र रन आणि उरलेले चेंडू यातील अंतर जास्त असल्याने पंजाबला विजयी घोषित करण्यात आले.
पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेटच्या बदल्यात 191 रन केले. तर कोलकत्ताने 7 विकेट कमावून 16 ओव्हरमध्ये 146 रन केले. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाने पंजाबला विजयी घोषित करण्यात आले.