भारताची वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत न्यूझीलंडविरुद्ध १३ जूनला होणार आहे. ही लढत येथील ट्रेंटब्रिजवर होणार असून या लढतीवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच जेवण्याच्या वेळेपर्यंत पाऊस थोडा कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येथील जास्तीत जास्त तापमान १३ अंश सेल्सिअस असणार आहे. तर रात्रीचे कमीतकमी तापमान १० किंवा ११ अंश सेल्सिअस असणार आहे. मैदान खेळण्यायोग्य असल्यास काही षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे. लंडनमध्ये सध्या मागील दोन दिवसांपासून सातत्याने मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. अशा स्वरूपाचा पाऊस आठवडाभर राहणार आहे. नॉटिंगहॅममध्ये बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे १३ जूनला होणाऱ्या सामन्यात पावसाचे सावट असल्याने हा सामना पूर्ण होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.