भारताचा झुंजार मल्ल आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. त्याने ६५ किलो गटातील चुरशीच्या किताबी लढतीत जपानच्या ताकातानी दाईचि याचा 11-8 गुणफरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पहिल्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
अपूर्वी चंदेला-रवी कुमार यांनी जिकंले कास्य पदक
नेमबाजीत 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत या जोडीने कास्यपदक पटकावले.
सुशीलकुमारला पराभव पत्करावा लागला.
सुशील कुमारला 74 किलो गटात बहारीनच्या एडम बातिरोककडून पराभवाचा सामना करावा लागला.