सरकारकडे एवढे पैसे येतात कुठून – आमदार यशोमती ठाकूर

Update: 2019-01-17 14:47 GMT

अमरावती – कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सरकार पाडण्याचे आटोकाट प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना शेकडो कोटी रूपयांची आमिषं दिली जात आहेत. एवढे पैसे सत्ताधारी भाजप सरकारकडे येतातच कुठून असा प्रश्न काँग्रेसच्या आमदार तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुमारे ३० हजार कोटी रूपयांची चोरी केलेली आहे. त्यामुळे चौकीदारच चोर आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अशा सरकारविरोधात मी बोलतच राहणार आहे. फारतर सरकार मला गौरी लंकेशप्रमाणे मारू शकते. पण मी चौकीदार चोरच असल्याचं वारंवार बोलत राहणार असल्याचे आमदार ठाकूर म्हणाल्या.

Similar News