स्त्रियांची सपोर्ट सिस्टीम

Update: 2019-01-14 11:58 GMT

भक्कम सपोर्ट सिस्टीम नसणं अशा समस्यांना कमी-अधिक प्रमाणात सर्वच स्त्रियांना सामोरे जावं लागत आहे. काही जणी पाळणाघर तसेच घरात मदतनीस ठेवण्याचा प्रयत्न करतात मात्र या संस्थांना कुठलीही विश्वासार्हता नसल्याने तो प्रयत्न फसूही शकतोच, अशा स्थितीत मनाला मुरड घालत आपल्या नोकरी, व्यवसायावर अनेक स्त्रिया पाणी सोडतात किंवा उच्च पद नाकारतात. आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या कामाच्या अनुभवात सातत्य नसल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर थेट परिणाम होतो. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेचा विचार करता स्त्रियांना कामाचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. भारतात श्रमशक्तीमध्ये जर स्त्रियांची संख्या फक्त १० टक्क्यांनी जरी वाढली तरी जीडीपीमध्ये मोठया संख्येने वाढ होऊ शकते. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. वयाच्या तिशीत मुलांसाठी ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना कामावर परतण्यास सहज पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी काही स्त्रियांनी प्रयत्न सुरू केले job for her, her second innings, sheroes, Avatar या काही साइट, विविध प्रकारे स्त्रियांना मदत करत आहेत. मात्र ही मदत तंत्रस्नेही स्त्रियांपर्यंतच पोहोचू शकते. या व अशा असंख्य प्रयत्नांची आपल्या सर्वांना गरज आहे.

Similar News