महिला लैंगिक उपभोगाचे साधन?

Update: 2019-01-10 08:13 GMT

आपण बऱ्याच टीव्ही चॅनल्सवरील मालिका, सिनेमा, नाटक इ. मध्ये महिलांची उपस्थिती प्रकर्षाने पाहत असतो. ज्यात महिला कलाकार नसेल ती मालिका किंवा सिनेमा फारसा चालत नाही किंवा आजवर अस कधी झालं नाही ज्यात महिलांना स्थान नसावे. जर मग महिला तुमच्या शो, मालिका, सिनेमाची शोभा वाढवत असेल तर त्या शोमध्ये महिलेला कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे हे काही नवीन नाही सांगण्यासाठी...

मात्र आजकाल जसं-जसे बिग बॉस सारखे रियालटी शो, नेटफिल्किसवरील वेबसीरीज येत आहेत त्यात महिला कलाकारांना दिली जाणारी व्यक्तिरेखा जरा तुम्हा आम्हाला खटकणारी आहे.

मराठी बिग बॉस 2018

या रियालटी शो मध्ये रेशम टिपणीस- राजेश यांच्या संबंधामुळे बिग बॉसच्या घरात रेशमला दिली जाणारी वागणूक अतिशय निंदनीय होती कारण एक महिला म्हणून तिला तिच स्वतंत्र आहे की तिने काय कराव काय करु नये मात्र तरीही बिग बॉसच्या घरात किंवा बाहेर प्रक्षेकांनी दिलेल्या प्रतिक्रियाकडे आपण सर्वांनी लक्ष देत रेशम टिपणीसवर टीका केली. हे थोडं मला खटकणारं वाटलं कारण तिलाही व्यक्तिस्वतंत्र आहे तिला तिच्या आयुष्यात काय करायचे आहे ते आपण नाही ठरु शकतं.

(सौ. युट्युब)

https://youtu.be/RgleizooOXc

नेटफिलिक्स सिक्रेट गेम

नेटफिलिक्सवरील सिक्रेट गेम मधील महिलांची व्यक्तिरेखा म्हणेज शिवागाळ आणि संभोगाची वस्तू... गणेश गायतोंडेची भूमिका साकारणारे नवाझुद्दीन सिद्दीकीच्या तोंडून महिलांसाठीची शिवीगाळ तसेच या सीरीज मध्ये महिलांना फक्त एक उपभोगाचे साधन म्हणून दाखवण्यात आलं आहे. हे विकृत मानसिकतेचं लक्षण असून महिलांचा अनादर करणारी ही सीरीज आहे.

(सौ. युट्युब)

https://youtu.be/pFHOvjZksYg

मिर्झापूर सीरीज

नेटफिल्किसवरील गाजलेली आणखी एक सीरीज म्हणजे मिर्झापूर यात कालीनभैय्याची दाखवलेल्या बायकोची भूमिका फक्त संभोगाची वस्तू म्हणून दाखवण्यात आली आहे. यात ती महिला आपली गरज पूर्ण होत नसल्याचं बोलली असता तिला कोट्यावर नेऊन बसवेल असा डायलॉग वापरण्यात आला आहे. पाहा हा व्हिडिओ..

(सौ. ऑल इन वन,युट्युब)

https://youtu.be/hspYslGr9AI

आता तुम्ही नेटफिल्किसवरील सीरीजमध्ये महिलांची व्यक्तिरेखा पाहिली या दोन्ही सीरीजमधून तिच्या चारित्र्यावर सतत शब्दांच्या किंवा सेक्सुलिटी च्या स्वरुपात घाला घालण्यात आला आहे.

आणि आता नुकतेच क्रिकेटर हार्दिक पंड्यांने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये महिलांविषयी केलेलं वक्तव्य... त्याने यावर माफीही मागितली मात्र अशा अनेक टॉकशो, सीरीज मध्ये महिलांची मानहानी होत असते. जे तुमच्या मनी असते महिलांविषयी ते कधीना कधी ओठावर येतच असते... पाहा काय बोलला हार्दिक पंड्या...

https://twitter.com/twitter/statuses/1082003121038114818

वरील रियालटी शो आणि सीरीजमध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना हीन दर्जात्मक व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत. एकंदरित महिलांच्या या व्यक्तिरेखा कुठेतरी विकृत मानसिकतेतून आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. या विकृतीला कधी चाप बसेल? माझ्या मते टीव्ही शो किंवा अशा पद्धतीने सुरु होणाऱ्या सीरीजमुळे महिलांची मानहानी होत आहे. आज समाजात महिलांवर चांगले सिनेमे आणि मालिका आहेत मात्र दुसरीकडे महिलांना केवळ लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून चित्रित केल जात असल्याचे दिसून येतेय. हे कुठतरी थांबल पाहिजे जर महिला तुमच्या नजरेत केवळ लैंगिक उपभोगाची वस्तू असेल तर त्यांना तुम्ही तुमच्या सीरीजमध्ये किंवा शोमध्ये तसाच्याच पद्धतीने चित्रीत करता.

ज्या महिला अशी व्यक्तिरेखा साकारातात या केवळ भूमिका करत असतात. टीव्ही शो, सिनेमा, मालिका या सर्वांतून महिलांची होणारी मानहानी हे खरंतर महिलांविषयी ज्या पद्धतीने विचार केला जातो त्याचे चित्रण असते. त्यामुळे महिलांविषयीचा आदर आदी मनात वाढवा तरचंत्याचे प्रतिबिंब इतर घटकांमध्ये असलेला पाहायला मिळेल.

Similar News