का नाकारला तिने सन्मानपूर्वक पद्मश्री पुरस्कार...

Update: 2019-01-27 09:00 GMT

विविध क्षेत्रातील नामवंतांनी दिलेल्या योगदानाबद्दल शासनानं ११५ जणांना पुरस्कार दिले. त्यामध्ये तिघांना भारतरत्न, चार जणांना पद्मविभूषण, १४ पद्मभूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये एका लेखिकेला पद्मश्री पुरस्कार जाहीर होऊनही त्यांनी तो सन्मानपूर्वक नाकारला आहे.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहिण गीता मेहता या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्या लेखनाची दखल घेत शासनानं त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पुरस्कार दिल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळं हा पुरस्कार स्विकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गीता मेहता यांनी कर्मकोला, राज, अर रिव्हर सूत्र, इटर्नल गणेशा- फ्रॉम बर्थ टू रिबर्थ या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. याशिवाय १४ पेक्षा जास्त माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनी केली आहे. गीता मेहता सध्या परदेशात स्थायिक असून भारत सरकारने दिलेला हा किताब त्यांनी नाकारला आहे. त्यांनी न्यूयॉर्कमधून केंद्र सरकार आणि माध्यमांना निवेदन पाठवून भारत सरकारचे आभार मानत हा किताब स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Similar News