लेखिकांचे प्रमाण कमी का? यावर माझ्या मनात असलेल्या काही प्रश्नांची मांडणी या लेखाच्या स्वरुपात करण्याचा प्रयत्न... साहित्यिक वर्तुळात लेखिकांचे प्रमाण कमी का असा प्रश्न पडल्यानंतर इतर अन्य क्षेत्रातही थोडं डोकवणून पाहिलं तर तिथेही हीच परिस्थिती असल्याचे आपल्याला पाहायला मिळाली. पुरुष लेखकांच्या तुलनेत लेखिकांचे प्रणाम हे कमी आहे. मात्र लेखिका कमी होण्यामागे काय कारणं असू शकतात. याचा कधी कुणी विचार केला नसावा. चला तर जाणून घेऊयात.
पोषक वातावरण असूनही...
लेखिकांचे प्रमाण कमी जरी असलं तरी ‘कविता’ आणि ‘आत्मकथन’ या दोन साहित्यप्रकारांवर लेखिकांनी आपली मुद्रा जेवढी ठळकपणे उमटवली तेवढी सरस आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्यांना कथात्म साहित्यप्रकारांमध्ये साधलेली नाही. गेल्या तीन दशकांतील समातील परिस्थिती स्त्रियांना पोषक आणि प्रोत्साहक म्हणावी अशी आहे. तसेच बऱ्यापैकी स्त्रियां या वर्ग-जातीच्या बंधनातून सुटलेल्या आहेत असं असतानाही लेखिकांची संख्या ही कमीच आढळते. खरंतर सांगण्यासाठी खूप काही आहे. मात्र स्त्रियांनी स्वतःभोवती बांधलेली ती चौकट तोडून स्वतःवर विश्वास ठेवत ही लेखनी हातात घेतली पाहिजे. मात्र अजूनही असं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. तर दुसरीकडे बहुतांश स्त्रिया सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित, नोकरदार, अर्थार्जन समर्थपणे करून आपल्या व्यवसायात लौकिकही मिळवू लागलेल्या आहेत. त्यांचे अनुभवविश्व सावकाश पण निश्चितपणे विस्तारते आहे. त्या करीत असलेल्या नोकऱ्या-व्यवसायांचे प्रकारही पूर्वीपेक्षा आमूलाग्र बदलले आहेत.
काय कारणे असू शकतात?
एतंदरितच महिला खूप बोलतात मात्र लिहित काही नाही असं चित्र जरी असं तरी त्यामागे कारणं ही तेवढीच आहे.
विषयांच्या दृष्टीने विचार केला तर लेखिकांचा विवाह, कुटुंब-त्यामुळे नातेसंबंधांत उत्पन्न होणारे ताण आणि पेचप्रसंग एवढय़ापुत्या मर्यादित राहातात. परंतु त्यातील गाठी-निगरगाठी उकलण्याचा प्रयत्न त्या कसोशीने करतात, याचे श्रेयही त्यांना अवश्य द्यायला हवे. बायका बोलतात मात्र लिहित नाही... आज काळाची गरज आहे. स्त्रियांनी लेखनी हातात घेतली पाहिजे. परंतु एका बाजूने हे असमाधान व्यक्त करीत असताना दुसऱ्या बाजूने, याच समूहाच्या संवेदनशील घटक म्हणून हेही जाणवते की बऱ्या-वाईट कोणत्याही अर्थाने स्वच्छंदी आणि आत्मनिर्भर जगण्याची संधी आणि मुभाच मिळत नसल्याने पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या अनुभवांची उपलब्धीच मर्यादित राहाते. म्हणजे रात्री-अपरात्री रस्त्यावरून साधे हिंडणे-फिरणे ही गोष्ट बाईला अजूनही शक्य होत नाही, तर त्याचे वर्णन ती निव्वळ ‘कल्पने’ने किंवा कल्पकतेने किती आणि कसे करेल! पारंपरिक आणि आधुनिक जीवन पद्धतींच्या टकरावातून उत्पन्न होणारे अनंत पेचप्रसंग, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिवादाने मिळालेल्या संधी, तशीच ओढवणारी संकटेसुद्धा, कुटुंबांतर्गत श्रमविभागणी, पालकत्वामुळे होणारी गोची, लैंगिक शोषणाच्या नाना तऱ्हा, जाती-धर्मामुळे आजही भोगावे लागणारे जीवघेणे दु:ख अशा साक्षात रणभूमीवर स्त्रिया प्रत्यही लढत, झगडत आहेत. मात्र स्त्रियांनी निर्भयपणे सामोरं जावे आणि एकदा का या त्यांना आपल्या आत्मशोधाच्या स्वयंप्रकाशी वाटा मिळाल्या की भविष्यात त्या इतरांनाही प्रेरणादायी आणि मार्ग दाखवतील मग लेखिकांचे अस्तित्व आपोआप सिद्ध होईल.