कुणाला हवीत ही स्मारकं? - शोभा डे

Update: 2019-01-24 08:02 GMT

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाचं गणेशपुजन नुकतंच पार पडलं. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क भागातील महापौर बंगल्यात हे भव्य दिव्य असे स्मारक होणार असून या स्मारकासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत एमएमआरडीएच्या माध्यमातून १०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यानंतर आता या स्मारकाला १०० कोटी दिल्याचा आक्षेप घेत लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे.

'कुणाला हवीत ही स्मारकं? आम्हाला शाळा आणि रुग्णालयं पाहिजेत,' असं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे. 'आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालयं हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या, एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायचा हे मी दाखवून देते,' असा आक्षेप त्यांनी सरकारवर केला आहे. यापूर्वी देखील शोभा डे अनेकदा ट्विट करण्यावरून चर्चेत आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या या उधळपट्टीला त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे लेखिका शोभा डे यांच्या स्मारक विरोधी भूमिकेवर शिवसेना आणि राज्यसरकार नेमकी कशी प्रतिक्रिया देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Similar News