मोदी निवृत्त होताच मी पण निवृत्त - स्मृती इराणी

Update: 2019-02-04 09:50 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांना भक्त का म्हटलं जातं याचा प्रत्यय आज पुण्यात आला. अनेकांनी मोदींची मर्जी संपादन करण्यासाठी मोठंमोठी वक्तव्यं यापुर्वीच केलेली आहेत. त्यात आता आणखी एक भर पडलीय ती केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची. पुण्यात आयोजित वर्डस् काऊंट फेस्टिवल या कार्यक्रमात स्मृती इराणींनी केलेल्या वक्तव्याचं अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

काय म्हणाल्या स्मृती इराणी ?

स्मृती यांना यावेळी त्यांच्या भवितव्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रधानसेवक होण्याची कुठलीही इच्छा नसल्याचं सांगितलं. ज्या दिवशी नरेंद्र मोदी निवृत्त होतील, त्याच दिवशी मीही भारतीय राजकारण सोडून देईन, असं स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं. प्रधानसेवक स्मृती इराणी कधी होतील, यावर कदापिही नाही, असं उत्तर इराणी यांनी यावेळी दिलं.

मी राजकारणात दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय. सध्या मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतेय. या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानं मी स्वतःला भाग्यवान समजते, असंही इराणी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान हा व्हिडिओ राज असरोंडकर यांनी फेसबुक पोस्ट केला असून त्याची लिंक या ठिकाणी घेतली आहे.

https://www.facebook.com/1601126602/posts/10212704782126709?sfns=cl

Similar News