उन्नाव गॅंगरेप केस मधील पीडित मुलीला जाळण्यात आले. ५ डिसेंबरला ९५ टक्के भाजलेली असूनसुध्दा या १९ वर्षाच्या मुलीने मॅजिस्ट्रेट समोर जबानी दिली. जाळणाऱ्या लोकांमध्ये दोन तरुण तेच होते. ज्यांनी तिच्या वर दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. या तरुणांचा बाप ही जाळण्यात सामील होता.
काल पीडित मुलीने सांगितलं की, मला जगायचंय. तिच्या भावानं ही माहिती मीडियाला दिली. काही वेळापूर्वी या मुलीचा मृत्यू झाला. ४ जून २०१७ या दिवसापासून सुरू असलेला तिचा संघर्ष थांबला. याच दिवशी भाजपच्या कुलदीप सेंगर नावाच्या आमदाराने तिच्यावर बलात्कार केला होता.
पोलिसांनी दखल घेतली नाही. १७ ऑगस्ट २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या समोर तिनं जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठं पोलीस, मीडिया आणि कोर्टाने तिची दखल घेतली. सेनगर वर गुन्हा दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयाने खटले दिल्लीत शिफ्ट केले. एप्रिल २०१८ ला स्वतः पंतप्रधानांनी या घटनेवर भाष्य केलं आणि घटनेची निंदा केली.
हे ही वाचा…
- खडसे-महाजन आमने सामने, आज जळगावात होणार बैठक
- HyderabadEncounter : जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड, जस्टीस हरिड इज जस्टीस बरीड -प्रा.हरी नरके
- फ्रान्समध्ये कामगारांच्या ऐतिहासिक संपाचे अन्वयार्थ
त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१८ ला पिडितेचा चुलता आणि मोठा भाऊ यांना यूपी पोलिसांनी अटक केली. १८ वर्षांपूर्वी त्यांनी गोळीबार केला होता. हे कारण देण्यात आलं. भाजप आमदार सेनगर च्या विरोधात खटला दाखल व्हावा. म्हणून पीडित मुलीच्या सोबत हेच दोघे असायचे.
२८ जुलै २०१९ ला मुलीला ट्रक ने उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस तिच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिलेले पोलीस गायब होते. त्यातून ती वाचली. पण ५ डिसेंबर २०१९ मात्र, तिच्या गावात तिला जाळण्यात आलं. तेव्हा ही सुरक्षेसाठी दिलेले पोलीस गायब होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे एअरलिफ्ट करून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण न्याय मिळवण्यासाठी तिची झुंज आणि थांबली. तिला जाळण्यात आल्यानंतर काही तासांनी हैदाबादमधील बलात्कार प्रकरणी आरोपींना एन्काउंटर मध्ये ठार केले गेले.
एखादी मोठी आणि अडचणीची घटना घडल्यानंतर मीडियाच्या हेडलाईन्स मॅनेज करण्यासाठी एखादी घोषणा वा पुडी सोडण्याचा प्रकार मोदी सरकारनं अनेकदा केलाय. पण या पीडित मुलीला जाळण्यात आल्याच्या प्रकरणात हेडलाईन्स मॅनेजमेंट करण्यात आली नसावी अशी अपेक्षा आहे. स्वतः पंतप्रधानांनी या घटनेवर भाष्य केलं होतं नाही का? पण हेडलाईन्स मॅनेजमेंट झाली हे नक्की.
हैदराबाद च्या बलात्काराच्या आरोपींना ठार मारलं म्हणून देशभरात हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं गेलं. उन्नावची बातमी कोपऱ्यात गेली. आरोपींना गोळ्या घालणाऱ्या पोलिसांवर फुलं उधळली गेली. ऊन्नाव प्रकरणी आमदार सेनगर आणि इतर आरोपींबाबत अभिनंदन करण्याची संधी यूपी पोलीस केव्हा देशाला देताहेत हे पहायचंय.
सुभाष शिर्के वरिष्ठ पत्रकार