राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात महिलांसाठी काय?

Update: 2019-01-15 09:49 GMT

आगामी निवडणूकांसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरु केली असून राष्ट्रवादीनेही धमाकेदार सुरुवात केली आहे. निर्धार परिवर्तनाचा माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनतेशी संपर्क करत संवाद साधत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचा लोकसभा निवडणूकीसाठीचा जाहीरनामा समितीत खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, खासदार सुप्रियाताई सुळे, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यांचा समावेश आहे. त्यामुळे एकंदरित राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मातब्बर महिला नेत्यांचा समावेश करण्यात आला असला तरी, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय असणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणारेय.

दरम्यान या जाहिरानाम्यांविषयी आमदार विद्या चव्हाण यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने संपर्क साधला असता...

- महिलांसाठी जास्तीत जास्त शौचालय

- अंगणवाडी यांची संख्या अधिक करण्याची गरज आहे

- महिलांना मोफत रेशन मिळावे

- एकल महिलांसाठी आमचं मोठ धोरण असून आम्ही एकल महिलांसाठी काम करत आहोत.

- एकल महिलांना संरक्षण देण्याची गरज

- महिलांना वस्तीगृह उपलब्ध करु

- हॉस्पिटलमधील नर्स सुरक्षा

- शहरीभागातील महिलांसाठी (शहापूर)येथे पाणीटंचाईवर मार्ग काढू

- ग्रामीण भागातील ऊसतोड कामगार महिलांसाठी घरे, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करु

- महिला बेरोजगारीवर तोडगा म्हणून अनेक लघुउद्योग सुरू करु

- महिलांसाठी कृषी केंद्राची उभारणी

- रेल्वे लोकल कर्मिशियलमध्ये घेऊन गेल्यास केंद्राकडून पैसे मागण्याची ही गरज रेल्वे प्रशासनाला लागणार नाही.

- तसेच महिलांना प्रत्येक मॉल मध्ये एक शॉप दिलं पाहिजे.

अशा अनेक मुद्द्यावर पक्षाशी बोलून याचा समावेश जाहिरनाम्यात करु असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Similar News