काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगार महिलांना मिळणार रोजगार ?

Update: 2019-01-15 13:43 GMT

2019च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी असली तरी जाहीरनाम्यात महिलांसाठी कोणते संकल्पाचे मुद्दे मांडण्यात आले आहे. याचा आढावा आपण घेत असून काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय असणारेय पाहुयात.

  • महिलांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा असून त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणार
  • महिला बेरोजगारांसाठी अनेक लघुउद्योग सुरु करणाक( पर्यटन, खाद्यसंस्कृती, कुकुटपालन, पॉल्

ट्री फार्म इ. )

  • अँग्रो प्रोसेस इंडस्ट्री उभारणार असून महिलांना तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध करुन देणार
  • स्त्री-पुरुष समानतेची जनजागृती करणार
  • महिला उद्योजिका तयार करणार

इत्यादी मुद्दे काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी निवडणुकांच्या जाहीरनाम्यात असणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितली.

यापूर्वीही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हेच मुद्दे प्रकाशित करण्यात आले होते. मात्र यंदा काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या हातात असल्यामुळे महिलांसाठीच्या या आश्वासनाची पूर्तता होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होतेय.

Similar News