आज ट्विटरवर #EmpoweringNariShakti ट्रेंडिंग आहे. सत्ताधारी भाजपाकडून महिला सशक्तीकरणाच्या मोठ-मोठ्या जाहिरातीचे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. सरकारी योजनांमुळे महिलांना किती फायदा झाला याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर या जाहिराती झळकू लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी महिला सशक्तीकरण, सुरक्षेबाबत बोलत आहे तर दुसरीकडे भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नेहमीच वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका, असं विधान केलं आहे. कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. मात्र, यात हिंदू महिलांचा हेगडे यांनी उल्लेख केला आहे. परंतु इतर जाती-धर्मातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणजे काहीच नाही असं चित्र यातून दिसून येत आहे. देशात भाजपाची सत्ता असून महिलांविषयी दुतोंडी भूमिका का... असा प्रश्न आता नेटिझन्सकडून उपस्थित होऊ लागला आहे. यापुर्वीही अनेकदा भाजपाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि समर्थकांनी महिलांविषयी बेताल वक्तव्यं केलं आहे. त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. आणि आज सोशल मीडियावर महिला सशक्तीकरणाचे गोडवे गात असताना भाजपाच्या खासदाराचे हे वक्तव्य येणे हे अशोभनीय असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
https://www.facebook.com/BJP4India/videos/602349420206495/