अशा झाल्या वैशाली येडे ‘कर्त्या स्त्री’

Update: 2019-01-12 11:57 GMT

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियातील महिलेने अर्थात वैशाली येडे यांनी केले. यावेळी वैशाली यांनी केलेले भाषणातून एकल महिलांच्या प्रश्नाला वाच्या फुटली. खरतरं एकल महिलांचा प्रवास हा खडतर आणि सोयीस्करित्या जगू न देणाऱ्या समाजातला आहे. वैशाली येडे त्यातील एक... म्हणजे एकल महिला... त्यांचं शिक्षण 12वी झालेलं आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. 18 व्या वर्षी सुधाकर येडे या शेतकऱ्यासोबत लग्न झाले. मात्र सतत च्या नापिकीने पतीने आत्महत्या केली. लहान वय, पदरी दोन मुलं आणि त्यातच घरातल्या कर्त्या पुरुषाची आत्महत्या... हे सगळ पाहता दुःखाचा डोंगर वैशाली यांच्यावर येऊन पडला होता. परिस्थिती अत्यंत हालाकीची... हाती पैसा नाही, समोर दोन मुलांच शिक्षण, संगोपण इ. सर्व कसं काय करावं अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असताना त्या खचल्या नाही, रडत बसल्या नाही, तर परिस्थितीला सामोरं जात त्यांनी दुःखाच्या डोंगराला हाताळून बिखट परिस्थितीतून मार्ग काढला. शेतकऱ्याच्या या लेकीने आपल्या पतीसारखं न खचता, न घाबरता या जन्मातील दुःखावर, अडचणीवर मात करत समाजाला एक नवीन दिशा दाखवली. आज अनेक नाटकांमध्ये काम करुन शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मांडणी करत रडायचं नाही तर लढायचं अशी शिकवण त्या देत आहेत. त्यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. आज घरातल्या त्या कर्त्यास्त्री आहे..

Similar News