मनी लाँड्रिंगप्रकरणी वाड्राची पुन्हा चौकशी; मात्र मी माझ्या पतीसोबत असल्याची प्रियंकाची ग्वाही

Update: 2019-02-09 08:25 GMT

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज पुन्हा दाखल झाले. यापूर्वी ईडीने वाड्री यांची दोन दिवस चौकशी केली होती, मात्र त्यातून ईडीचे समाधान झाले नसल्यामुळे आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर करण्यात आलं आहे. काल (शुक्रवार) वाड्रा, पत्नी प्रियांका गांधींसोबत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. या कार्यक्रमातील काही व्हिडिओ एबीपी माझाचे पत्रकार प्रशांत कदम यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

https://twitter.com/_prashantkadam/status/1093863219813367808

वाड्रा यांची चौकशी करणाऱ्या टीममध्ये ईडीचे संयुक्त संचालक, उप संचालक आणि इतर ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी दिल्लीच्या एका कोर्टाने वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपासून ईडीच्या अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांच्या अंतरिम जामिनासाठीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले. वाड्रा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देताना कोर्टाने ईडीला ६ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे.

वाड्रा हे सर्व प्रश्नांची उत्तरे देत ईडीला योग्य ते सहकार्य करत असल्याचे वाड्रा यांच्या वकिलाने बुधवारी म्हटले होते. काँग्रेस पक्ष देखील वाड्रा यांच्या पाठिशी असल्याचे वकिलाने स्पष्ट केले आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान प्रियंका गांधीही ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मी माझ्या पतीसोबत असल्याचे प्रियंका गांधी यांनीही म्हटले होते.

Similar News