आज हिवाळी अधिवेशातील महत्त्वाचा दिवस असून लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होत आहे. तिहेरी तलाकमधून मोदी सरकार लोकांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करु पाहात आहे. तसे होऊ नये म्हणून आम्ही सरकारविरोधात आमची भूमिका सभागृहात मांडणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे तिहेरी तलाक विधेयक मुस्लिम महिलांना त्याच्या त्रासातून मुक्ती देणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे ठरेल असं भाजपचे मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे. दरम्यान लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.