त्या करत आहेत दररोज 500 किलो कचऱ्यापासून खत निर्मिती

Update: 2019-01-16 12:02 GMT

यवतमाळ मध्ये सध्या 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात साहित्या बरोबरच खानपानाची रेलचल असते. संमेलनात दररोज सुमारे 1800 साहित्यप्रेमी जेवणाचा आस्वाद घेत असतात. जेवण बनवण्यापासून ते संपल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा होतो. यात राहिलेला ओला कचरा, उश्ट - खरकटं तसेच टाकाऊ कचऱ्यातुन जवळपास सुमारे 200 किलो भाज्यांची देठं आणि सालींसह सुमारे 300 किलो उश्ट्या खरकट्या अन्नाचाही समावेश होतो. या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी स्रीमुक्ती संघटनेच्या कचरा वेचक महिलांकडून सुका व ओला कचरा वेगवेगळा करण्यात येत आहे. स्वच्छतेबरोबरच गोळा झालेल्या कचऱ्यातून खतनिर्मिती केली जात असल्याने या महिलांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

या महिला सर्व कचरा एकत्र करुन त्यापासुन खत निर्मिती करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतूक संयोजन समितीसह संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी केले आहे. साहित्यप्रेमींनी केलेल्या कचऱ्यापासुन या कचरा वेचक महिलांनी खत निर्मिती करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

Similar News