ठाण्यातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून शर्मिष्ठा सोम या 27 वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी घडली असून अभ्यास न झाल्यामुळे ही आत्महत्या झाल्याची प्रथम माहिती मिळाली आहे.
शर्मिष्ठा ही ठाणे- मुंबईतील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचल्याच अंदाज व्यक्त केला आहे. ही घटना कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ अभ्यास न झाल्यामुळे शर्मिष्ठा सोम हि ने पाऊल उचलले असल्याचे समोर आलेलं आहे.