मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैशाली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वतःच्या जीवनातील संघर्षमय कहानी मांडली आहे. त्या म्हणतात... मी साहित्य वाचलेले नाही पण माणसे वाचली आहेत. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे सांगून नवर्याने आत्महत्या केली. कारण माझ्या नवर्याचा या जन्मावर विश्वास नव्हता. म्हणून त्याने आत्महत्या केली. पण, माझा या जन्मावर विश्वास आहे. मी याच जन्मावर रडत नाही तर लढत आहे. वायद्याची शेती फायद्यात आणेल, अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय मदतीला येते. मला व्यवस्थेने विधवा बनवले आहे. पण मी नाही, तर एकल महिला आहे, अशा शब्दांत वैशाली येडे यांनी मनोगत व्यक्त केले.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2260128640931222/