महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिकेत डॉ. आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नाही. यामुळे विरोधकांनी फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल भाजपच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटलाय. शासनाच्या दिनदर्शिकेत या दोघांचाही उल्लेख टाळण्यात आलाय. ही दिनदर्शिका नाही तर वैचारीक 'दीनता'दर्शिका आहे..! तसेच यापुढे अशी चुक झाली तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही अशा इशारा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पाहा हा व्हिडिओ
https://youtu.be/_EVSeTU0pnI